SSC CGL 2025 NOTIFICATION- एसएससी कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल) परीक्षेची अधिसूचना प्रसिद्ध​

SSC CGL (Combined Graduate Level) ही Staff Selection Commission द्वारे घेतली जाणारी परीक्षा आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) संयुक्त स्नातक स्तर (CGL) परीक्षा 2025 साठी अधिसूचना जारी केली आहे. ही परीक्षा केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये गट B आणि C पदांसाठी भरतीसाठी घेतली जाते.

SSC CGL 2025 NOTIFICATION- एसएससी कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल (सीजीएल)
SSC CGL 2025 परीक्षेची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे! एकूण 14582 पदांसाठी भरती होणार असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. स्पर्धा परीक्षार्थींसाठी ही सुवर्णसंधी आहे!

SSC म्हणजे काय? 

SSC म्हणजे कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission). ज्याप्रमाणे MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) हि एक ही महाराष्ट्र राज्याची भरती संस्था आहे. त्याचप्रमाणे SSC हि एक केंद्रीय सरकारी संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालयं, विभागं आणि कार्यालयांमध्ये नोकरीसाठी उमेदवारांची भरती करते – मुख्यतः गट B आणि गट C संवर्गातील पदांवर.

SSC काय करते?

SSC हे विविध स्पर्धा परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड करते. या परीक्षांमधून सरकारी विभागांमध्ये अधिकारी, लिपिक, निरीक्षक, सहाय्यक, कनिष्ठ अभियंते इत्यादी भरती केली जाते.

SSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या काही प्रमुख परीक्षा:

  • SSC CGL – पदवीधरांसाठी गट B आणि C पदांसाठी

  • SSC CHSL – १२वी पास उमेदवारांसाठी

  • SSC MTS – दहावी पास उमेदवारांसाठी बहुउद्देशीय कर्मचारी भरती

  • SSC GD Constable – निमलष्करी दलांमध्ये भरती

  • SSC JE – कनिष्ठ अभियंता भरती

SSC चे मुख्यालय:

SSC चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि देशभरात त्याची क्षेत्रीय कार्यालयं आहेत.

SSC च्या परीक्षा या UPSC पेक्षा तुलनात्मकदृष्ट्या सोप्या असतात, पण उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे स्पर्धा मात्र तितकीच तीव्र असते. त्यामुळे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास गरजेचा असतो.

अधिसूचना व महत्त्वाच्या तारखा

अधिसूचना प्रसिद्ध

24 जून 2025

ऑनलाईन अर्ज सुरू

24 जून 2025

अर्जाची अंतिम तारीख

4 जुलै 2025

सुधारणा विंडो

9–11 जुलै 2025

टियर I परीक्षा

(संगणक-आधारित
परीक्षा)

अंदाजे वेळापत्रक १३ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२५

टियर II परीक्षा

(संगणक-आधारित
परीक्षा)

अंदाजे वेळापत्रक डिसेंबर २०२५

SSC CGL 2025 पदे

  • Assistant Section Officer

  • Inspector (Income Tax, CBI, NIA इ.)

  • Assistant Audit Officer / Accountant / Auditor

  • Junior Statistical Officer (JSO)

  • Tax Assistant, Sub Inspector इ.

पात्रता व वयोमर्यादा

शैक्षणिक पात्रता:

  • सर्वसामान्य पदांसाठी: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक.

  • JSO साठी: गणित किंवा सांख्यिकीची पदवी (60% किमान काही स्रोतांनुसार).

  • Statistical Investigator Grade-II साठी: सांख्यिकी आधारित पदवी.

SSC CGL 2025 वयोमर्यादा (1 ऑगस्ट 2025 अनुसार):

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 27–32 वर्षे (पदानुसार  बदल)

  • SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे सवलत

अर्ज प्रक्रिया व फी

  • OTR Registration करणे अनिवार्य (SSC संकेतस्थळावर).

  • फोटो, स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक.

  • फी: सामान्य / OBC – ₹100 (SC/ST/PWD/महिला/माजी सैनिकांसाठी माफ).

  • एकदा सबमिट केल्यावर फक्त एकदा फॉर्म भरणे वैध.

परीक्षा पद्धत

SSC CGL 2025 2 टप्प्यात (Tier-I आणि Tier-II) घेतली जाते.

Tier-I

विभागप्रश्नगुणवेळ

सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशक्ती

255060 मिनिटे

 सामान्य ज्ञान

2550 

संख्यात्मक क्षमता

2550 

इंग्रजी भाषा

2550 

Tier-II

  • Paper I: सर्वांसाठी आवश्यक (वैध प्रकार).

  • Paper II: JSO पदांकरिता.

  • Paper III: Assistant Audit Officer/Accounts Officer पदासाठी.

वेतनमान

SSSC CGL पदानुसार वेतनमान Pay Level 4–7 मध्ये ₹25,500 ते ₹1,42,400 पर्यंत असू शकते. (उदा., Tax Assistant).

काही टिपा MPSC विद्यार्थ्यांसाठी:

  • SSC CGL परीक्षा MPSC एवढीच स्पर्धात्मक आहे.

  • MPSC पूर्व परीक्षेसाठी केलेले General Studies आणि Aptitude चे अभ्यास SSC साठी उपयुक्त ठरतो.

  • राज्यसेवा परीक्षेसाठी तयारी करताना केंद्र सरकारची नोकरी ही एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीचा सराव SSC साठी महत्त्वाचा आहे.

महत्वाच्या लिंक्स:

जाहिरात (PDF)

Online अर्ज

अधिकृत वेबसाइट

Leave a Comment