तुम्ही MPSC ची तयारी करत आहात का? मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे! MPSC Group B Combined Exam 2025 Group B (Non‑Gazetted) संयुक्त पूर्व परीक्षा 2025 (Non-Gazetted) ची अधिकृत जाहिरात आज अखेर प्रसिद्ध झाली आहे आणि त्यामुळे राज्यातील हजारो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय. अराजपत्रित पदांसाठी घेण्यात येणारी ही परीक्षा म्हणजे तुमचं स्वप्न साकार करण्याची सुवर्णसंधी! तुम्ही अजून तयारीला सुरुवात केली नसेल, तरीही अजून वेळ आहे — या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत.
सध्या प्रसिद्ध झालेली MPSC Group B Combined Exam 2025 संयुक्त पूर्व परीक्षा ची जाहिरात ही 282 पदांसाठी आहे, ज्यामध्ये STI (राज्य कर निरीक्षक) 279 पदे आणि ASO (सहाय्यक कक्ष अधिकारी) 3 पदांचा समावेश आहे. मात्र ही फक्त सुरुवात आहे! येत्या काही महिन्यांत हीच जाहिरात 800 हून अधिक पदांपर्यंत वाढवली जाण्याची शक्यता आहे — ज्यामध्ये PSI (पोलीस उपनिरीक्षक), STI, ASO आणि नव्याने SR (सहाय्यक निबंधक) यांसारख्या पदांचा समावेश होणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांनी आजवर तयारीची वाट पाहत थांबले होते, त्यांच्यासाठी आता ही खरी संधी आहे — लक्ष्य ठेवा, अभ्यास करा आणि MPSC Group B Combined Exam संयुक्त पूर्व परीक्षा 2025 मध्ये यश मिळवा.
MPSC म्हणजे काय? आयोगाची रचना, जबाबदाऱ्या आणि संपूर्ण मार्गदर्शन हवे आहे का?
तर आम्ही यावर आधीच एक सविस्तर लेख लिहिलेला आहे. MPSC बद्दल प्राथमिक माहिती, परीक्षा घेण्यामागची उद्दिष्टे, आणि आयोगाचे कार्य या सर्व गोष्टी समजून घ्या [MPSC म्हणजे काय? आयोगाचे कार्य आणि महत्त्व]
MPSC Group B (Non-Gazetted) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा Exam Pattern
[MPSC Group B Exam Pattern (परीक्षा पद्धती)] या लेखात तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षा कशा प्रकारे घेतल्या जातात, त्यातील विषय, गुणविभागणी व वेळ याची माहिती मिळेल.
MPSC Group B (Non-Gazetted) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा Eligibility Criteria
तसेच [MPSC Group B Eligibility Criteria (पात्रता निकष)])] या लेखात वयमर्यादा, शैक्षणिक पात्रता व आरक्षण याची सविस्तर माहिती दिली आहे.
आधी हे लेख वाचा आणि मग पुढे अर्ज प्रक्रियेबद्दल आणि तयारीबद्दल वाचा. योग्य दिशेने तयारी करणे हेच यशाचे गमक आहे.
MPSC Group B Combined Exam 2025 पदांचा तपशील
पदाचे नाव | गट | एकूण पदे |
---|---|---|
सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) | गट-ब (अराजपत्रित) | 3* |
राज्य कर निरीक्षक (STI) | गट-ब (अराजपत्रित) | 279* |
एकूण पदे | 282* |
* टीप -1 या पदांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इमविज, अपंग व महिला आरक्षण लागू आहे.
2 पुढील काही महिन्यांत PSI, SR (सहाय्यक निबंधक) अशा आणखी पदांची भरती जाहीर होऊन ही संख्या 800+ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.
MPSC Group B Combined Exam 2025 अर्ज प्रक्रिया व महत्त्वाच्या तारखा:
टप्पा | दिनांक व वेळ |
---|---|
ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | 1 ऑगस्ट 2025, दुपारी 2:00 पासून |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत |
परीक्षा शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरण्याची अंतिम तारीख | 21 ऑगस्ट 2025 21 ऑगस्ट 2025, रात्री 11:59 वाजेपर्यंत |
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख | 21 ऑगस्ट 2025 |
पूर्व परीक्षा दिनांक (अनुमानित) | 09 नोव्हेंबर 2025 |
महत्त्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात (PDF)
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक
अधिकृत वेबसाईट (MPSC)
MPSC Group B Combined Exam 2025 ही परीक्षा राज्यातील हजारो उमेदवारांसाठी सरकारी सेवेत प्रवेश करण्याची सुवर्णसंधी आहे. तुमचं स्वप्न ASO, STI, PSI किंवा इतर गट-ब अराजपत्रित पदांवर काम करण्याचं असेल, तर आता वेळ आहे तयारीला अंतिम वळण देण्याची. नोव्हेंबर 2025 मध्ये होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी तुम्हा सर्व उमेदवारांना MPSCshalaटीमकडून हार्दिक शुभेच्छा!
✅ लक्षात ठेवा — आयोग वेळोवेळी नवीन अपडेट्स, सुधारणा सूचना किंवा पदसंख्या वाढीव माहिती जाहिर करतो. त्यामुळे MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (https://mpsc.gov.in) नियमितपणे भेट देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, परीक्षेची तयारी, टिप्स, अभ्यासक्रम विश्लेषण आणि वेळोवेळी येणाऱ्या भरती अपडेट्ससाठी MPSCshala तुमच्यासोबत आहे.
📌 अर्ज करताना सर्व माहिती नीट भरावी, आवश्यक कागदपत्रं अपडेट ठेवावीत, आणि ऑनलाइन फॉर्मची प्रिंट नक्की घ्यावी. कोणतीही घाई न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, आणि दररोज थोडा वेळ चालू घडामोडींसाठी (current affairs) राखून ठेवा — कारण हीच तयारी अंतिम यशाचा पाया ठरेल.